संपूर्ण राज्यात उभारणार चार्जिंग स्टेशन – ना. अजित पवार

पुणे, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन टाकणार असून चांद्यापासून बांद्यापर्यंत आता प्रत्येक पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन सुरू करावे लागणार आहे. केंद्र सरकारने तसं धोरण आखले आहे, असं अजित पवार म्हणाले.

 

पुरंदर तालुक्यातील निंबूत येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या समता पॅलेस वातानुकूलित नुतन वस्तूच्या उद्घाटन समारंभात अजित पवार बोलत होते. अजित पवार पुढं बोलताना म्हणाले की, काल कालवा सल्लागार समितीची आढावा बैठक झाली. नीरा डावा आणि नीरा उजवा कालवा जूनपर्यंत बंद होणार नाही असा निर्णय आम्ही घेतला आहे. परंतु पाणी आहे म्हणून आहे दिसेल तिथे कांडे दाबत बसू नका. ज्यांनी नियमितपणे कर्ज भरले आहे त्यांना आम्ही 50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी लावलेला ऊस वेळेत गेला पाहिजे याची खबरदारी आम्ही घेत आहोत, असंही ते म्हणाले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content