संत ज्ञानेश्वर विद्यालयात पर्यावरणपूरक होळी, धुलीवंदन उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मेहरुण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे होळी व धुलिवंदन साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष तथा मेहरूणचे नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या हस्ते पर्यावरणपूरक कचर्‍याची होळी पेटविण्यात आली. तसेच विद्यार्थिनींनी पर्यावरणपूरक रंग खेळत धुलीवंदन साजरी केली.

श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रसंगी मंचावर श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा संस्थेचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रशांत नाईक, संस्थेचे सचिव तथा उपशिक्षक मुकेश नाईक ,मुख्याध्यापिका शितल कोळी, उपशिक्षिका स्वाती नाईक उपस्थित होते.

यावेळी होळी सणाचे महत्व संस्थेचे सचिव तथा उपशिक्षक मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. यानंतर पर्यावरणपूरक कचऱ्याची होळी तयार करीत ती संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते पेटविण्यात आली. यावेळी परिसरातील महिलांनी पूजा-अर्चना करीत होळीला वंदन केले. यानंतर विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक रंग खेळत धुलीवंदन साजरी केली. डीजेच्या तालावर ‘रेन डान्स’ करत विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. एकमेकांना रंग लावत विद्यार्थ्यांनी उत्साह आणला. सूत्रसंचालन रूपाली आव्हाड यांनी केले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व परिसरातील नागरिक आदी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content