संत जगनाडे गो शाळेत पोळा साजरा

चोपडा, प्रतिनिधी । संत जगनाडे जगदीश गोपाल गोशाळा व गो अनुसंधान संस्था चोपडातर्फे ६  सप्टेंबर रोजी बैल पोळा हा सण उत्सहात साजरा करण्यात आला.

संत जगनाडे गो शाळेत पोळा सणानिमित्ताने बैलांची, गाईंची व गोवंशाची आंघोळ करून त्यांना सजवण्यात आले.  त्यांची पूजा करून पुरणाची पोळी खाउ घालण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष  देवकांत  के. चौधरी व त्यांच्या धर्मपत्नी सौ धनश्री देवकांत चौधरी यांनी पूजन  केले.  यावेळी  देवकान्त चौधरी यांनी समस्त शेतकरी बांधवांना शुभेच्छा देऊन गोवंशाचे जतन व संवर्धन करण्याचे आवाहन केले.  यावेळी हभप गोपीचंद महाराज, प्रदेश तेली महासंघ जळगाव जिल्हा अध्यक्ष  के .डी .चौधरी सर आदी उपस्थित होते.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!