संतापजनक : अल्पवयीन भाचीला अश्लील चित्रफित दाखवणाऱ्या मावशीसह प्रियकराला अटक !

शेअर करा !

पुणे (वृत्तसंस्था) अल्पवयीन भाचीला जबरदस्तीने अश्लील चित्रफीत दाखवून शोषण करणाऱ्या मावशीसह तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. एप्रिल महिन्यात पुण्यातील कोंढवा परिसरात हा संतापजनक प्रकार घडला होता.

एप्रिल महिन्यात लॉकडाऊन सुरु असताना पीडित मुलीची आई आपल्या चार मुलांना बहिणीकडे सोडायची. यावेळी मावशीचा प्रियकर तिला भेटण्यासाठी घरी यायचा. मावशी आणि तिचा प्रियकर इच्छेविरोधात तिला अश्लील चित्रफीत दाखवत होते. मुलीने जवळपास चार महिने हा प्रकार सहन केला. परंतू त्यांनतर मात्र, त्यांनी हिंमत दाखवत आपल्या आईला घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांची कोरोना चाचणी केली आहे. यामध्ये दोन्ही आरोपींचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!