संतश्रेष्ठ ज्ञानोबा, संत तुकोबांच्या पालखी सोहळ्याच्या तारखा जाहीर !

पुणे – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या तारखा जाहीर करण्यात आले आहे. दोन वर्षाच्या कालावधीनंतर यंदा मोठ्या संख्येने वारकरी देहू आळंदीत दाखल होणार असल्याची माहिती संस्थानच्या वतीने कळविण्यात आले आहे.

दि. २० जून रोजी तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सुरू होणार आहे. तर दि. २१ जून रोजी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. मागील दोन वर्षांपासून देशात करोना संकट असल्याने नियम व अटींचं पालन करून हा पालखी सोहळा पार पडला आहे. पण यावर्षी करोना संकट काहीसं कमी झालं झालं आहे. त्यामुळे सध्या देहू आणि आळंदी येथे पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. जगद्गुरू संत तुकोबांची पालखी २० जून रोजी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार आहे. दरम्यान, पालखी सोहळ्याची तारीख जाहीर झाल्याने जोरदार तयारी सुरू झाली आहे. अखेर दोन वर्षानंतर हा पालखी सोहळा संपन्न होतोय, त्यामुळे लाखोंच्या संख्येनं वारकरी देहूत दाखल होतील, अशी माहिती माणिक महाराज मोरे यांनी दिली आहे.04:02 PM

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content