संततधार पावसात महापौरांनी केली नाल्यांची पाहणी !

शेअर करा !

 

जळगाव (प्रतिनिधी) पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व नाले, उपनाले आणि गटारींची साफसफाई करण्यात आली होती. बुधवारी सकाळपासूनच शहरात संततधार पाऊस असल्याने महापौर भारतीताई सोनवणे यांनी मेहरूण आणि अयोध्यानगरात नाल्यांची पाहणी केली.

 

नाल्यांची पाहणी करताना महापौर भारतीताई सोनवणे यांच्यासोबत नगरसेवक कैलास सोनवणे, प्रशांत नाईक, गणेश सोनवणे, उमेश सोनवणे, आशुतोष पाटील, विजय वानखेडे, शोभा चौधरी आदी उपस्थित होते. मेहरूण आणि अयोध्यानगरात नाल्यावर नव्याने पूल बांधण्यात आले असून दोन्ही बाजूला मजबूत संरक्षक भिंत बांधण्यात आल्याने कुठेही पाणी अडत नसल्याने महापौरांनी समाधान व्यक्त केले. तसेच कुठेही नाल्याचे पाणी कुठे तुंबत असेल किंवा साफसफाई योग्य प्रकारे झालेली नसल्यास तात्काळ तक्रार करावी, असे महापौर सौ.भारती सोनवणे यांनी नगरसेवकांना सांगितले.

 

दरम्यान, मेहरूण परिसरात एक खोलगट आणि कमी रुंदीचा नाला असून त्यावर अनेक ठिकाणी अतिक्रमण असल्याने पावसाळ्यात नागरिकांना मोठ्याप्रमाणात पाणी तुंबण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची बाब यावेळी निदर्शनास आली. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी त्या नाल्याचे पूर्ण सर्व्हेक्षण करून नव्याने नाला बांधण्यासाठी प्रस्ताव द्यावा असे नगरसेवकांना सुचविले.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!