संजय राऊत म्हणतात, कसबा तो झांकी है !

कोल्हापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खासदार संजय राऊत यांनी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालावर भाष्य करतांना सत्ताधार्‍यांना आव्हान दिले आहे.

ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत हे आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर असून पत्रकारांशी वार्तालाप करतांना त्यांनी पुन्हा एकदा भाजप आणि शिंदे गटाला लक्ष्य केले आहे. ते म्हणाले की, या दोन्ही मतदारसंघातील निकाल हा धडा आहे. महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्यासाठी एक मार्गदर्शक आहे. २०२४ पर्यंत महाविकास आघाडीने मजबुतीने काम केलं आहे. २०२४ साली विधानसभेत महाविकास आघाडीच्या २०० पेक्षा जास्त जागा निवडून येतील. लोकसभेमध्ये ४० जागा निवडून येतील, कसबा झाकी है, महाराष्ट्र बाकी है, असा दावाच खासदार संजय राऊत यांनी केली.

दरम्यान, राऊत पुढे म्हणाले की, ’चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय आहे, हे कुणीच माणणार नाही. हा जगताप पॅटर्नचा विजय आहे. राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली. आम्ही त्यांना माघार घ्यायला लावली असती तर निकाल वेगळा आला असता.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content