संचारबंदीत उड्डाणपूलाचे उद्घाटन ; आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध गुन्हा

अमरावती (वृत्तसंस्था) संचारबंदी लागू असताना शासनाची कुठलीही परवानगी न घेता अमरावती शहरातील राजापेठ येथील रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपूलाचे उद्घाटन केल्याप्रकरणी बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध राजापेठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

राजापेठ पोलिस स्टेशनमधील सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मेहेत्रे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आमदार रवी राणा यांच्यासह कार्यकर्ते आणि ऑटोरिक्षाचालकांविरुद्ध शनिवारी रात्री आपत्ती व्यवस्थापन कायदा उल्लंघन केल्याप्रकरणी भादंवि कलम 188, 269 नुसार संचारबंदी, साथरोग कायद्याचे उल्लंघन प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. उदघाटन करण्यासाठी आमदार रवी राणा यांनी ऑटो रिक्षा आणि 15 ते 20 कार्यकर्ते जमवल्याचा आरोप आहे.

Protected Content