श्री क्षेत्र सुना सावखेडा येथे महाआरतीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन

फैजपुर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्री क्षेत्र सुना सावखेडा येथे दिनांक 26 नोव्हेंबर रोज शनिवार रोजी महाआरतीचे आयोजन करण्यात आले असून महाआरती सोबत दुपारी २ ते ५ संगीतमय सुंदर कांड (श्री सिताराम सत्संग मंडळ जळगाव) ५ ते ६ उपस्थित सर्व संत मंडळींचे आशीर्वाचन व मार्गदर्शन त्यानंतर ६.१५ मिनिटांनी२६/११ रोजी झालेल्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस कर्मचारी व भारतीय जवान यांना श्रद्धांजली कार्यक्रम, संध्याकाळी ६.३० वेळेत सामूहिक हनुमान चालीसा पठण, ६.४५ वाजता सामूहिक महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरिजी महाराज फैजपूर, शास्त्री भक्ती किशोर दास जी सावदा परमपूज्य संत श्री गोपाल चैतन्य जी बाबा पाल आश्रम, परमपूज्य स्वरूपानंद महाराज श्री शेत्र डोंगरदे, हभप दुर्गादास महाराज खिर्डी, हभप धनराज महाराज अंजाळेकर, हभप भरत महाराज, म्हैसवाडी इत्यादी संत मंडळींसह माननीय आमदार शिरीष चौधरी व अमोल हरिभाऊ जावळे उपस्थित राहणार आहेत. सदरील कार्यक्रम श्री शेत्र सुना सावखेडा हनुमानजी मंदिर संस्थांचे गादीपती स्वामी जगत प्रकाश दासजी यांच्या प्रेरणेतून संपन्न होत असून या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने भाविकांनी आपली उपस्थिती द्यावी, असे आवाहन स्वामी जय नारायण स्वामी जयप्रकाश ( चेतन जी) पार्षद गिरीश भगत सुना सावखेडा मंदिर व श्री कष्टभंजन सुना सावखेडा ग्रुप व भक्तगण यांनी केले आहे.

कार्यक्रम संपल्यानंतर येणाऱ्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्याचसोबत सर्व भाविकांना आरतीची व्यवस्था ही मंदिर क्षेत्रावरच करून देण्यात येणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content