श्री अरिहंत मार्गी जैन महिला संघाच्या एक्युप्रेशर व सुजोक थेरपी चिकित्सा शिबिरास प्रारंभ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । णमोत्थुणं सिध्द साधक आचार्य प्रवर श्री ज्ञानचंद्रजी म.सा. यांच्या स्वर्ण दिक्षा वर्षनिमीत्‍त एक्युप्रेशर रिसर्च ट्रेनिंंग आणि उपचार संस्थान जोधपूर यांच्या सयुक्‍त विद्यमाने श्री अरिहंत मार्गी जैन महिला संघातर्फे आजपासून एक्युप्रेशर व सुजोक थेरपी चिकित्सा शिबिरास प्रारंभ झाला असून हे शिबिर २६ जाने पर्यंत करण्यात आले आहे.

शिबिराचे उदघाटन युवाशक्‍ती फॉउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया, डॉ.कौशल जैन यांचे हस्ते झाले. यावेळी आशा पगारीया, ललीता श्रीश्रीमाळ,सुनिता कोचर, गिता संकलेचा,आशा कावडीया, मधु बुरड,ज्योती गादीया,सुरेखा चोपडा, सपना छोरीया, चंद्रकला सुराणा, सुनंदा सांखला, संध्या मृणोत,शोभा पगारीया, ललीता चोरडीया, ललीता दर्डा इ मान्यवर उपस्थीत होते. शिबिरात रक्‍तदाब, सायाटिका, गॅस, थॉयराईड,दमा, हाथापायात मुंग्या येणे, लकवा, कंबर,पाठ जॉईंट पोटाचे आजार, लठठपणा, गुडघा दुखी, मधुमेह,डोळयांचे आजार, नाक,कान घसा आजार, माईग्रेन डोकदुखी इ आजारावर एक्युप्रेशर व सुजोक थेरपीव्दारा उपचार केले जाणार आहे. प्रत्येक व्यक्‍तीवर २० ते २५ मिनिटाचा इलाज केला जात आहे. शिबिर अरिहंत भवन दाढीवाला बंगला जिल्हापेठ या ठीकाणी सकाळी ९ ते १ व दुपारी ३ ते ६ या वेळेत होत आहे.

मान्यवरांनी ही थेरेपी एक नैसर्गिक प्राकृतिक उपचार पध्दती असून हातापायात एक्युप्रेशर पाँईटस असतात ते दाबून शरीरातील रोग प्राकृतिक पध्दतीने विना औषध बरे होतात. रक्‍तप्रवाह व रोगप्रतिरोधक शक्‍तीत वाढ होते असे सांगितले. या शिबिरात एक्युप्रेशर रिसर्च ट्रेनिंंग आणि उपचार संस्थान जोधपूर येथील डॉ. एम आर जाखड,डॉ. सोहनलाल यासह डॉक्टरांची टीम सेवा देणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content