श्रीराम मंदिर भूमिपूजनासाठी महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांना उपस्थित राहण्याचे आमंत्रण

शेअर करा !

मुक्ताईनगर प्रतिनिधी। अयोध्या श्रीराम जन्मभूमी दिनांक ५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मंदिर भूमिपूजन कार्यक्रमात अखिल भारतीय आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष तथा सरपंच आश्रम फैजपूर येथील महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांना उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले असून श्रीक्षेत्र कोथळी मुक्ताईनगर येथील पवित्र माती सोबत नेण्यासाठी आले होते.

adv final
WhatsApp Image 2020 08 11 at 2.57

तापी-पूर्णा संगमावरील पवित्र जल व संत मुक्ताबाई समाधी स्थळ श्रीक्षेत्र कोथळी मुक्ताईनगर येथील पवित्र माती सोबत नेण्यासाठी आज महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज, खासदार रक्षाताई खडसे, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्रजी फडके, श्री संत मुक्ताबाई संस्थान अध्यक्ष भैय्यासाहेब रवींद्र पाटील हभप रविंद्र महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजन करून संकलित करण्यात आले. यानंतर सर्व मान्यवरांनी माजी मंत्री एकनाथरावजी खडसे यांची सदिच्छा भेट घेतली.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!