श्रीमती क पु पाटील विद्यालयात मुकेश पाटील यांचा सत्कार

 

नंदुरबार : प्रतिनिधी । विविध प्रकारच्या सामाजिक कामगिरीबद्दल श्रीमती क पु पाटील विद्यालयात या शाळेचे माजी विद्यार्थी  मुकेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला

 

भालेर ( ता.जि. नंदुरबार ) येथील क पु पाटील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी मुकेश पाटील याने जळगाव येथे कोरोनाकाळात बेवारस प्रेतांवर जीवाची पर्वा न करता शिष्यवृत्तीच्या पैशातून  सहकाऱ्यांच्या मदतीने अंत्यसंस्कार केले होते व  गरजूंना मोफत जेवणही  दिले होते . “एक आठवण आपल्या दारी” या उपक्रमाअंतर्गत   वृक्षारोपण केले असे विविध सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले

 

मुकेश पाटील यांच्या कामांची  दखल घेऊन मराठी राज्य पत्रकार संघ यांनी मुंबई येथे त्यांचा गौरव केला. त्यानंतर विविध सामाजिक संस्थानीदेखील त्यांचा गौरव केला मुकेश पाटील यांनी तेथेच न थांबता पुरस्काराच्या रकमेतून गरजूंना जेवणाची सोय करून दिली सुमारे  1200 लोकांना  जेवणाच्या थाळी उपलब्ध करून दिल्या आता त्यांच्या कामाची  दखल  घेत शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून या शाळेकडूनही मुकेश पाटील यांचा गौरव करण्यात आला . मुकेश पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला

 

सत्काराला उत्तर देताना मुकेश पाटील म्हणाले की , लहानपणापासूनच मनात ठरविले होते की एक दिवस मीपण ह्या मंचावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहील ती  इच्छा आज  सत्काराच्या  निमित्ताने पूर्ण झाली यापुढेही सामाजिक सेवेचे कार्य चालू राहील गावाचे व शाळेचे नाव मोठे करेन . यावेळी  प्राचार्या सौ.  व्ही .  बी.  चव्हाण , पर्यवेक्षक ए.  व्ही.  कुवर ,  शिक्षक व  शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!