श्रद्धाच्या मारेकऱ्याला फाशी द्या : सकल हिंदू संघटनेची मागणी

फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | श्रद्धा हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून तिच्या मारेकऱ्यास फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सकल हिंदू संघटनेतर्फ निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

 

निवेदनात म्हटले आहे  की,  श्रध्दा हिच्या मारेकरी आफताब  व त्याच्या परिवाराला या गुन्हयाची कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे.  उत्तर प्रदेश राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात सुध्दा लव जिहाद कायदा करण्यात यावा. सदर घटनेच्या तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून करण्यात यावा. हा घटना जलदगती न्यायालयासमोर चालवून तात्काळ आरोपीस फाशीची शिक्षा दयावी. फॉरेन्सिक लॅब तज्ञांची नियुक्ती या प्रकरणाच्या तपासासाठी करावी. आरोपीस कायदयातील कलम ३०२ प्रमाण मनुष्यवधाचा गुन्हा व कलम २०१ प्रमाणे पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा द्यावी  निवेदन देतांना डॉ प्रियदर्शनी सरोदे, सावदा माजी नगराध्यक्ष अनिताताई येवले, अॅड. कालिदास ठाकूर, सावदाचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, भाजपाचे अध्यक्ष जितेंद्र भारंबे, बजरंग दलाची, जिल्हा संयोजक प्रतीक भिडे, फैजपूर भाजपा शहराध्यक्ष अनंता नेहते, अनिरुद्ध सरोदे, प्रभुदास महाजन, दीपक पाटील, हर्षल महाजन, राहुल भोई, वैभव तेली, संदीप भारंबे, सुनील जोगी, देवेंद्र जोशी, अनुराधा परदेशी, भारती पाटील, दिपाली झोपे यासह सर्व सहया करणारे सकल हिंदू संघटना व समाज रावेर व यावल तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content