मुंबई (वृत्तसंस्था) सुधारित नागरी कायदा (सीएए) लागू न करायला मुख्यमंत्र्यांच्या बापाचं राज्य आहे का?, अशी जळजळीत टीका भाजपचे नेते आशीष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती. त्यावर शेलार जर बाप काढत असतील तर आम्ही गुजरातमध्ये जाऊन बापाचा शोध घेत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
नालासोपारा येथील एका कार्यक्रमात भाजप नेते आशीष शेलार यांनी केंद्र सरकारने मंजूर केलेले नागरिकत्व संशोधन कायदा लागू न करायला हे राज्य का तुमच्या बापाचे आहे का?, अशा शब्दात शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती. या टीकेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला असून आशीष शेलारांना हे वक्तव शोभत नाही. पण आशीष शेलार जर बाप काढत असतील तर आम्ही गुजरातमध्ये जाऊन बापाचा शोध घेत नाही, अशा शब्दांत आव्हाड यांनी आशीष शेलार यांना प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत नागरिकत्व संशोधन कायदा आणि एनआरसीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानुसार महाराष्ट्रात एनआरसी लागू होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.