शेतातील विहिरीत तरूणाचा मृतदेह आढळला

अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील देशमुख नगरातील २७ वर्षीय तरुणाचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत अमळनेर पोलिसात आकस्मात मूर्तीची नोंद करण्यात आली आहे.

तेजस मनोहर मगर(पाटील) वय-२६, रा. दादासाहेब अशोकराव देशमुख नगर, अमळनेर असे मृत तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तेजस मगर हा आपल्या कुटुंबीयांचा वास्तव्याला आहे. शनिवारी १२ नोव्हेंबर रोजी दुपारी अमळनेर-धुळे रोडवरील साहेबराव पाटील यांच्या शेतातील विहिरीत तेजस मगर चा मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळून आला. याबाबत अमळनेर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह विहिरीतून बाहेर काढून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात देण्यात आला. वैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान तेजसने आत्महत्या केली की, पाय घसरून पडला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत अमळनेर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास पोलीस नाईक हितेश चिंचोरे करीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content