यावल, प्रतिनिधी | येथील बोरावल रोडवरील एका शेतकऱ्याच्या शेतातील १५०० केळीची झाडे कापुन अज्ञात भामट्याने नुकसान केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
संदर्भात पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार, शेतकरी भागवत सुपडु फालक (वय ५९) रा. महाजन गल्ली यावल यांनी चार वर्षापुर्वी चितोडा ता. यावल येथील राहणारे छगन कडु चौधरी यांनी इंदुबाई रविन्द्र करांडे यांचे यावल शिवारातील भालशिव रस्त्यावरील शेती क्रमांक१२६o ही शेतजमीन निम बटाईने करीत आहेत. या शेतामध्ये सद्या केळीचे पिक पेरणी केलेली असुन , या केळीला घळ लागलेले आहेत. व ही केळी पिके एक महीन्यानंतर कापणी सारखी होणार होती. भागवत फालक हे १९ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता शेता गेले होते व ते सायंकाळी ५ वाजता घरी निघुन गेले. परंतु २० जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता भागवत फालक हे त्यांचा मुलगा कल्पेश फालक सोबत गेले असता केळीवर फवारणी करीत असतांना त्यांना केळीच्या झाडावरील सुमारे चाळीस हजार रुपये किमतीचे १५oo केळीचे अर्धवट कापलेले दिसुन आलेत. फालक यांनी आपले सहकारी छगन चौधरी यांच्याशी तात्काळ संपर्क साधुन त्यांना सदरच्या घटनेची माहीती दिली. व फालक यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसात अज्ञात भामट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे. दरम्यान सहकारी पीक सरक्षक सोसायटीच्या वतीने संदीप डिंगबर फालक व रविन्द्र रमेश धांडे यांच्या समक्ष केळी पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे .