शेतकऱ्यांना पीकविमाचा लाभ तातडीने अदा करा; भाजपाचे यावल तहसीलदारांना निवेदन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यात केळी पकि विमा कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांना पीकविमा लाभापासून वंचीत राहवे लागत आहे. त्यामुळ प्रशासनाने याची दखल घेत तातडीने पीकविम्याचा लाभ बँक खात्यात तातडीने अदा करावी अशी मागणीचे निवेदन भाजपाच्या वतीने यावल तहसीलदारांनादेण्यात आले.

 

यावल तालुक्यातील शेतकरी बांधवांनी केळी फळपिक विमा काढलेला असुन नुकतेच उन्हाळी केळी पिक विमा तालुक्यातील काही मंडळ अधिकारी यांच्या क्षेत्रात मंजुर झाला आहे.  परंतु यंदाचे तापमान बधितले असता संपुर्ण तालुक्यातील तापमान हो सारखेच आहेत. तरी शासनाने शेतकऱ्यांचे विषयाचे गांभींयाने विचार केल्यास हे शेतकऱ्यांवर अन्याय करण्यासारखे असल्याचे दिसुन येत आहे.  असे असतांना  केळी पिक विमा कंपनीने यावल ,भालोद ,फैजपुर या मंडळ क्षेत्राला सोडून विमा मंजुर केला आहे, तरी हे चुकीचे असुन शेतकऱ्यांवर अन्याय करण्यासारखेर आहे. तरी या विषयावर तात्काळ विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्वरीत या समस्यावर निर्णय घ्यावा व शेतकऱ्यांना केळी पिकविमा चा लाभ मिळवण्यासाठी प्रयत्व करून न्याय मिळवुन द्यावा, अन्यथा भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

 

यावल तहसीलचे निवासी नायब तहसीलदार संतोष विंनते यांना देण्यात आलेल्या निवेदनावर भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे , किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष नारायण चौधरी , भाजपा ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष हेमराज फेगडे , भाजपाचे शहराध्यक्ष निलेश गडे , भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष सागर कोळी ,पराग सराफ, योगराज बऱ्हाटे, योगेश सांळुके , व्यंकटेश बारी , सचिन बारी , अनंत नेहते , नितिन नेमाडे , अनंत फेगडे , दिपक पाटील , परिष नाईक यांच्या स्वाक्षरी आहेत .

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content