शेठ ला.ना. विद्यालयातून शुभम बडगुजर अव्वल; शाळेचा १०० टक्के निकाल

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । येथील शेठ लालजी नारायणजी सार्वजनिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दहावीच्या शालांत परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून शाळेतून शुभम प्रमोद बडगुजर याने ९७ टक्के गुण मिळवत प्रथम आला.

शेठ लालजी नारायणजी सार्वजनिक विद्यालयातील ३८३ विद्यार्थी दहावीच्या परिक्षेला बसले होते. सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकुण विद्यार्थ्यांपैकी १९७ विद्यार्थी विशेष प्राविण्य, १२८ प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणीत ५३ विद्यार्थ्यांचा समोवश आहे. तर२७ विद्यार्थ्यांना शेकडा ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहे.

विद्यालयातून प्रथम शुभम बडगुजर (९७ टक्के), द्वितीय गणेश बापुराव व्हनमणे (९६.८०), तृतीय रोहन भरतकुमार वाघ (९५.२०), चतुर्थ मयुर गोपाळ महाजन (९४.८०) तर पाचवा तन्मय भागवत तावडे (९४.२०) असे गुण मिळविले आहे. तन्मय भागवत तावडे या विद्यार्थ्यांने संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले असून सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि कौतूक शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष ॲड. सुशील अत्रे, सचिव अभिजीत देशपांडे, विश्वस्त प्रेमचंदजी ओसवाल, शरदचंद्र छापेकर, पारसमल कांकरिया, दिलीप मुथा, सतिश नाईक, शाळेच्या समन्वयिका मीरा गाडगीळ, विजयालक्ष्मी परांजपे, मुख्याध्यापक दुर्गादास मोरे यांनी अभिनंदन केले आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!