शेंदूर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी | संत कडोजी महाराज संस्थानचे रथोत्सव बुधवार रोजी साजरा करण्यात येणार आहे. या पाश्र्वभूमीवर शांतता समिती सदस्यांची बैठक बाजार समितीच्या सभागृहात आज आयोजित करण्यात आली.
संत कडोजी महाराज संस्थानच्या २७७ वा रथोत्सव बुधवार,. १७ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने नियमांचे पालन व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आज बाजार समितीच्या सभागृहात शांतता समितीची बैठक पार पडली. यावेळी
अध्यक्षस्थानी पाचोरा उपविभागीय पोलिस अधिकारी भरत काकडे हे उपस्थित होते. तसेच पहुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे व पोलिस उपनिरीक्षक मोहिते यांचीही उपस्थिती होती. प्रमुख उपस्थिती म्हणून माजी पं.स.सदस्य सुधाकर बारी, माजी सरपंच सागरमल जैन ,शांताराम गुजर,माजी उपसरपंच गोविंद अग्रवाल, पंडितराव जोहरे,पंडित दीनदयाळ अध्यक्ष अमृत खलसे, नगरसेवक शरद बारी, हभप कडोबा माळी, संत कडोबा संस्थान सदस्य भगत, राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य धीरज जैन, रविंद्र गुजर, अजय निकम, शिवसेना शहर प्रमुख संजय सूर्यवंशी, बारकू जाधव, पत्रकार बंधुं व ग्रामस्थ उपस्थित होते. तत्पूर्वी नियमावली व कायदा सुव्यवस्था विषयावर सविस्तर चर्चा करून डीवायएसपी भरत काकडे यांनी मार्गदर्शन केले.