शेंदुर्णी गावातील एका महिलेवर अत्याचार; पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावातील एका भागात राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या संदर्भात रविवारी २१ मे रोजी रात्री उशिरा एकावर पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पहूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील शेंदुर्णी गावातील एका भागात तीस वर्षीय महिलाही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २० मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास गावात राहणारा शहरात बाबुराव बारी याने अनधिकृतपणे घरात प्रवेश करत दरवाजा बंद केला व महिलेशी जबरदस्ती करू लागला. दरम्यान महिलेने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिचे तोंड दाबून जेवेठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. तसेच या प्रकाराबाबत ‘कोणाला काहीही सांगितले तर तुला व तुझ्या मुलांना मारून टाकेल’, अशी धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. महिलेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी शरद बाबुराव बारी यांच्या विरोधात रविवारी २१ मे रोजी रात्री उशिरा पाहून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील करीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content