शुल्लक कारणावरून दोघांवर चॉपरने हल्ला

चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | एका मुलाला मारहाण झाल्यावर विचारणा केल्यावरून दोघांवर चॉपर व लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची थरारक घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीसात पाच जणांविरुद्व गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, शहरातील गांधी चौकातील वैभव अरुण रोकडे (वय-२४) हे वरील ठिकाणी कुटुंबासह वास्तव्याला असून भारत वायररोप कंपनीत नौकरीला आहे. दरम्यान शुक्रवार (ता. १८) रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास वैभव  रोकडे, भूषण मंजाळे व सौरभ कोळी हे तिघेही छाजेड मिलच्या पाठीमागे गप्पा मारत बसले होते. तेवढ्यात त्याच परिसरात राहणारा पृथ्वी कैलास कुमावत हा रडत आला. त्याला विचारणा केली असता मला सुलतान शेख रहेमान शेख व वाजित खान साबीर खान यांनी चापटांनी मारहाण केल्याची सांगितले. याबाबत विचारणा करण्यासाठी गेले असता वरील तिघांना मारहाण करायला सुरुवात केली. हैदर अली याने त्याच्या हातातील चॉपरने भूषण मांजाळ याच्या पोटात वार करू लागला.

परंतु भूषणने तो वार हाताने अडविल्याने चॉपरचा वार उजव्या मांडीवर लागला. तर नवाज याने लाकडी दांडक्याने वैभव रोकडे याच्या डोक्यात मारली. व इतरांनी पाठीवर, हातावर मारहाण केली. दरम्यान यावेळी आरडाओरड केल्याने गल्लीतील लोकांनी धाव घेऊन सोडविले. मात्र मारहाण करणारे लागलीच घटनास्थळून पळ काढले. यात भूषण व वैभव दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने औषोधोपचारकामी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला. तत्पूर्वी या घटनेने परिसरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी वैभव रोकडे यांच्या जाब जबाबावरून चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात हैदर अली आसिफ अली, नदीम खान साबीर खान उर्फ गोल्डन, सुलतान शेख रहेमान शेख, वाजित खान साबीर खान, नवाज व इतर दोन इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरु आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content