शुक्रवारी अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाची बैठक

यावल, प्रतिनिधी | संस्थापक अध्यक्ष जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रणित.भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासच्या जळगाव जिल्हा संघटनेची पुर्नरबांधणी करण्यात येणार आहे. यासाठी शुक्रवार २६ नोव्हेंबर रोजी बैठकीचे आयोजन जळगाव येथे करण्यात आले आहे.

 

भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास निरीक्षक तथा सरचिटणीस अशोक सब्बन यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली शुक्रवार, दि.२६ नोव्हेंबर रोजी दुपारी ठीक १ वाजता जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत जिल्हा, तालुका व शहर कार्यकारणीची नविन बांधणी करण्यासाठी कार्यकर्त्यांची निवड करून मान्यतेसाठी केंद्रीय कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे. तरी जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रामाणिक, चारित्रसंपन्न,त्यागी, निस्पॄह,सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेल्या व समाज कार्यासाठी वेळ देवू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी या बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा संघटक सुरेश पाटील यांनी केले आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!