शिवसेनेतर्फे उद्या आयुष्यमान भारत कार्डाचे वाटप

 

 

जळगाव :  प्रतिनिधी । विराज कावडीया यांच्या नेतृत्वात शिवसेनेतर्फे आयुष्यमान भारत कार्ड बनविण्याचे शिबीर घेण्यात आले होते. शिबिरात ५०० कार्ड बनविण्यात आले आता वाटप शुक्रवारी गणेशवाडी येथील नानीबाई दवाखान्याजवळ करण्यात येणार आहे.

 

हे वाटप महापौर जयश्री महाजन व जिल्हा शल्यचिकित्सक नागोजी चव्हाण यांचे हस्ते होणार आहे.

 

या वेळी माजी महापौर नितीन लड्ढा, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, संघटक दिनेश जगताप, विराज कावडीया उपस्थित राहणार आहेत .

 

आयुष्मान भारतच्या राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना, ज्यामध्ये १० कोटी हून अधिक गरीब आणि असुरक्षित कुटुंबे (अंदाजे ५० कोटी लाभार्थी) मिळतील, प्रत्येक कुटुंबासाठी ५ लाख रुपये वीमा उपलब्ध आहे. या योजनेचे फायदे देशभर आहेत आणि योजनेंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्याला देशभरातील कोणत्याही सार्वजनिक किंवा खाजगी रूग्णालयांमधून (जे या योजनेत नावनोंदणी केलेले आहेत) कॅशलेस लाभ घेण्याची मुभा दिली जाईल.

 

या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे  आवाहन  शिवसैनिक विराज कावडीया यांनी केले आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.