शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी बाळासाहेब आंबेडकर यांची घेतली भेट

भुसावळ – वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर हे भुसावळ येथे आदिवासी हक्क परिषदेच्या निमित्ताने आले होते. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी त्यांची भेट घेऊन स्वागत केले.

 

या भेटी दरम्यान भुसावळ विधानसभा तसेच आगामी निवडणुका संदर्भात चर्चा झाली. यावेळी तालुकाप्रमुख संतोष सोनवणे, विधानसभा क्षेत्रप्रमुख निलेश महाजन, संघटक बबलू बर्‍हाटे, भुसावळ शहरप्रमुख दीपक धांडे,. वरणगाव शहरप्रमुख संतोष माळी, ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश चौधरी, रहीम गवळी, प्रा. दिलीप सुरवाडे, वरणगाव शाखा प्रमुख संजीव कोळी, प्रवीण बाविस्कर, योगेश कोळी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Protected Content