शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखांची रेडप्लस ब्लड बँकेला सदिच्छा भेट

जळगाव, प्रतिनिधी । शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्याचे कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांच्या समवेत पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगाव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांनी  रेडप्लस ब्लड बँक जळगाव येथे सदिच्छा भेट दिली. 

रेडप्लस ब्लड बँक चेअरमन डॉ. मोईज देशपांडे व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जळगाव शहर समन्वयक जितेंद्र गवळी, सह-समन्वयक भावेश ढाके, विभाग समन्वयक विशाल निकम, दिपक घ्यार, पवन सोनवणे, चेतन परदेशी, शुभम गवळी, शुभम बोदडे, राहुल नेतलेकर तसेच जळगाव शहरातील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.  शिवसेना नेते, विधीमंडळ गटनेते तथा राज्याचे नगरविकासमंत्री ना. एकनाथराव शिंदे  यांच्या संकल्पनेतून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थपना करण्यात आली आहे.  जळगाव जिल्ह्यातील विविध वृत्तपत्रांच्या संपादकीय कार्यालयांना भेटी देवून पत्राकारांना फर्स्ट एड किट (प्राथमिक उपचार पेटी) भेट म्हणुन देण्यात आली.

 

वैद्यकीय मदत कक्षाच्या शहर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती 

मंगेश चिवटे  व अमोल पाटील व डॉ. मोईज देशपांडे, जितेंद्र गवळी यांच्या उपस्थितीत वंदनिय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या शहर पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. शहर सह-समन्वयकपदी भावेश ढाके तर विभाग समन्वयकपदी विशाल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रसंगी जळगाव शहरातील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!