शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे चषक कबड्डी स्पर्धांचे भूमिपूजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना जळगाव महानगरतर्फे २१ ते २३ जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. क्रीडांगणाचे भूमिपूजन महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते गुरूवार १९ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता करण्यात आले.

याप्रसंगी उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, नगरसेवक नितीन बरडे, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेविका ज्योती तायडे, माजी नगराध्यक्ष चत्रभुज सोनवणे, महानगर प्रमुख शरद तायडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी वरील मान्यवरांसह समन्वयक अंकुश कोळी, सुनील राणे, उपमहानगर प्रमुख गणेश गायकवाड, प्रशांत सुरळकर, मानसिंग सोनवणे, फरीद खान, बाळासाहेब कखरे, अल्पसंख्यांक आघाडीचे जाकीर पठाण, विभागप्रमुख किरण भावसार, विजय बांदल, प्रकाश बेदमुथा, निलेश देशमुख, मोहसीन पिंजारी, राहुल पार्चा, पुनम राजपूत, अक्षय गोयर, चेतन छजलानी, बजरंग सपकाळे, महीला आघाडीच्या नीलू इंगळे, गायत्री सोनवणे, विमल वाणी, शारदा तायडे, जितू बागडे, विवेक सार्सर, गोपी राजपूत, लखन सांगीले, डॉ.जुबेर शेख, रोहित डाबोडे, बन्सी माळी, बंटी सानप, संजय सांगळे, प्रकाश व्यास, अरुण गावंडे, दीपक आरडे, बंटी सय्यद, हितेश सोनी, हरीश शेळके, अनिल कोळी, जितू बारी, पिंटू कोळी, वृषभ तायडे, मनोज कोळी, प्रशांत तायडे, पप्पू तायडे, शकील रंगरेज, सलीम शेख, तमील शेख, अमान शेख आदी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content