शिवकॉलनी पाईपलाईनचे काम अंतीम टप्प्यात ; महापौर, उपमहापौरांनी केली कामाची पाहणी

 

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील शिवकॉलनी परिसरात मध्यरात्री होणारा पाणीपुरवठा टाळण्यासाठी महापौरांनी त्याठिकाणी सुरू असलेले अमृत योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अवघ्या आठवडाभरात बहुतांश काम पूर्णत्वास आले असून बुधवारी कामाची महापौर सौ.भारती सोनवणे व उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी पाहणी केली.

 

शिवकॉलनीवासियांना गेल्या २० वर्षापासून सुरळीत पाणी पुरवठ्यापासून वंचित रहावे लागत आहे. स्थानिक नगरसेवकांनी याबाबत महापौर सौ.भारती सोनवणे यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी अमृत योजनेच्या ठेकेदार व मनपा अधिकाऱ्यांना घेऊन प्रत्यक्षात पाहणी केली होती. अमृत योजनेंतर्गत पाईपलाईन जोडणीचे संपूर्ण काम पंधरा दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या होत्या. गेल्या आठ दिवसात पाच वेळा महापौरांनी प्रत्यक्षात जाऊन कामाची पाहणी केली. बुधवारी काम अंतिम टप्प्यात आलेले असल्याने महापौर सौ.भारती सोनवणे यांनी पाहणी केली. यावेळी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, स्थायी समिती सभापती ऍड.शुचिता हाडा, नगरसेवक कैलास सोनवणे, सचिन पाटील, मनोज काळे व मनपा अधिकारी उपस्थित होते. पाईपलाईन जोडणीचे काम अंतिम टप्प्यात असून पुढील आठवड्यात नागरिकांना पूर्ण दाबाने आणि सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे. विशेषतः महापौरांच्या तत्परतेमुळे नागरिकांना रात्री २ वाजता उठून पाणी भरण्याचा त्रास वाचणार असून रात्री १० च्या आतच नागरिकांना भरपूर पाणी मिळणार आहे.

Protected Content