शिरसोली वावडदा रस्त्यावर चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील शिरसोली ते वावडदा रस्त्यावर दुचाकीस्वाराला भरधाव चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने 20 वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी साडेबारा वाजता घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, रणजित संभाजी पानगडे (वय-२०) रा. इंदिरानगर, शिरसोली हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शिरसोली ते वावडदा रस्त्याने रणजित पानगडे हा दुचाकीने जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव महिंद्रा पिकअप व्हॅन (एमएच १९ सीयु ४९६३) जोरदार धडक दिली. या धडकेत रणजीत पानगडे हा जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच  परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन तातडीने त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मदत घोषित केले.

मयत रणजित याच्या पश्चात आई, बहिण,काका असा परिवार आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!