शिरसोली येथे जुगाराचा डाव उधळला; १ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथे डी.एड. महाविद्यालयाजवळ सुरु असलेल्या जुगार अड्डयावर शुक्रवारी एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ११ संशयितांना ताब्यात घेतले असून दुचाकी, मोबाईल व रोकड असा १ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

store advt

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विनायक लोकरे यांना शिरसोली येथे महाविद्यालयाच्या बाजूला मोकळया जागेच जुगार सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस उपनिरिक्षक विशाल सोनवणे, निलेश पाटील, शुध्दोधन ढवळे, आसिम तडव यांना सुचना केल्या. त्यानुसार पथकाने शुक्रवारी सायंकाळी ४.१५ वाजता शिरसोली येथील जुगारावर कारवाई केली.

जुगार खेळणारे ११ जण ताब्यात
या कारवाईत पथकाने जुगार खेळणार्‍या मुरलीधर रामदास बारी (वय 60), सुनील सिताराम बारी (वय 49), शशीकांत पुंडलिक अस्वार (वय 31), संजय पंडीत पाटील (वय 50), ज्ञानेश्‍वर त्र्यंबक बारी (वय 41), कैलास शंकर भोई (वय 36), योगेश संजय बारी (वय 32), अरमान शब्बीर पिंजारी, (वय 35), श्रावण शंकर ताडे (वय 52), शिवाजी हरी बारी (वय 45) व शिवदास उत्तम बारी (वय 35) सर्व रा. शिरसोली प्र.बो. या सर्वांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ९ हजार ४०० रुपये रोख, २२ हजार रुपये किमतीचे विविध कंपनीचे मोबाईल व १ लाख २५ हजारांच्या दुचाकी असा एकूण १ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर आदेशाचे उल्लंघन हे कलमही गुन्ह्यात लावण्यात आले आहे

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!