जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । के.सी.ई. सोसायटी संचालित शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे दोन दिवसीय स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप करण्यात आला.
स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सादर करण्याचे व्यासपीठ आहे. नृत्य, कला, संगीत हे जीवन जगण्याची कला आपल्याला शिकवतात म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःला अवगत असलेली कला सादर करावी, असे विचार अध्यक्षीय मनोगतात शशिकांत वडोदकर यांनी व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणशास्त्र महाविद्यालय खिरोदा येथील प्राध्यापक साहेबराव भूकन, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे, उपप्राचार्य डॉ. केतन चौधरी, प्रा. डॉ. निलेश जोशी, प्रा.डॉ. सुनीता नेमाडे, प्रा. शालिनी तायडे उपस्थित होते. यावेळी वार्षिक पारितोषिक वितरण करण्यात आले. यात क्रीडा, सामान्य ज्ञान यासह विविध विषयात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक, सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन गायत्री शिंदे तर आभार उपप्राचार्य प्रा. डॉ. केतन चौधरी यांनी मानले. यावेळी विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.