शिक्षकांनी सामाजिक भान जोपासत दिली ऑटोमॅटिक लादी सफाई मशीन भेट

चाळीसगाव, प्रतिनिधी ।  कोरोना काळात आपल्या दातृत्वाचा परिचय देत तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापक यांनी कोविड निधी जमा करून ऑटोमॅटिक लादी सफाई मशीन भेट देऊन एक आदर्श उपक्रम राबविला आहे. 

कोरोनाच्या काळात आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापकांनी विविध उपक्रम राबवून मदती केली आहे. शिक्षण विभाग व पंचायत समितीच्या पुढाकाराने हे कार्य सुरू आहेत. शिक्षक व मुख्याध्यापक यांच्याकडून काही दिवसांपूर्वी कोव्हिड निधी जमा करून ७ ऑक्सिजन concentrator खासदार उन्मेष पाटील यांच्याहस्ते ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना देण्यात आले होते. आज रविवार रोजी येथील ट्रामा केअर सेंटरला याच कोव्हिड निधीतून ऑटोमॅटिक लादी सफाई मशीन भेट देण्यात आली आहे. या सफाई मशीनच्या लोकार्पणप्रसंगी आमदार मंगेश चव्हाण म्हणाले , “कोरोनाच्या वाईट काळात प्रत्येकाने सामूहिक जबाबदारीने वागले पाहिजे. त्याचेच भान ठेवत चाळीसगाव तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी ५ लाख रुपयांचा कोरोना निधी संकलित केला. त्याचे वितरण अश्या लोकोपयोगी वस्तू घेऊन ते करत आहेत. कोविड केअर सेंटर येथे रुग्णांसाठी, लसीकरणाला येणाऱ्या नागरिकांसाठी स्वच्छ व निरोगी वातावरण राहावे यासाठी आपण त्यासाठी मदत करावी अशी विनंती केली. आणि त्यांनी ती मान्य करत अतिशय अत्याधुनिक असे ऑटोमॅटिक लादी सफाई मशीन भेट देखील दिले आहे. ही शिक्षकांची दातृत्वाची वृत्ती समाजासाठी आदर्श अशीच आहे. लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांच्या प्रत्येक कार्यात सोबत असून सर्व चाळीसगाववासीयांच्या वतीने त्यांचे आभार मानत असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले. सदर साहित्य लोकार्पणप्रसंगी गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, गट शिक्षणाधिकारी विलास भोई, पंचायत समिती सभापती अजय पाटील, उप सभापती सुनील पाटील, पंचायत समिती गट नेते संजय पाटील, माजी सभापती दिनेशभाऊ बोरसे, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, नगरपालिका गटनेते संजय पाटील, जेष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी, भाजप शहराध्यक्ष नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, नगरसेविका विजयाताई पवार,  रिपब्लिकन पक्षाचे नेते नगरसेवक आनंद खरात, बापू अहिरे, जितेंद्र वाघ, अमोल चव्हाण, बबन पवार, अमोल चौधरी, रोहन सूर्यवंशी, चेतन पाटील आदी उपस्थित होते. यांसोबतच शिक्षकवृंद अजित पाटील, विश्वास सूर्यवंशी, महेंद्रसिंग सिसोदे, दिलीप सावंत, विनायक ठाकूर, चंद्रमणी पगारे, विजय निकम राजेंद्र पाटील,भैय्यासाहेब वाघ, नितीन खंडाळे ,पंढरीनाथ पवार,पंकज रणदिवे आदी शिक्षक बांधव उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी विलास भोई यांनी तर सूत्रसंचालन भैय्यासाहेब वाघ व आभार विजय निकम यांनी मानले.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.