शिंदे इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘डॉक्टर्स डे’ उत्साहात

पाचोरा, प्रतिनिधी । गिरणाई शिक्षण संस्थे अंतर्गत शिंदे इंटरनॅशनल स्कूल येथे ‘डॉक्टर्स डे’चे औचित्य साधून शाळेतील पालक डॉक्टर यांचा गौरव सत्कार समारंभ करण्यात आला. 

जगातील सर्व डॉक्टर बांधवांनी कोविड – १९ प्रादुर्भाव असतानाही आपल्या कुटुंबापासून दुर राहून रुग्णांची सेवा केली. या ऋणातून उतराई होण्यासाठी गिरणाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंडित शिंदे यांनी पाचोरा भडगाव पंचक्रोशीतील सर्व डॉक्टर्स यांना शिंदे इंटरनॅशनल स्कूलमध्ये आमंत्रित करून त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचा गुण गौरव व सत्कार करून त्यांचे मुक्तकंठाने कौतुक केले.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिंदे इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य डॉ. विजय पाटील यांनी केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष पंडित शिंदे, सचिव ॲड. जे. डी. काटकर, संस्थेचे जॉईंट सेक्रेटरी शिवाजी शिंदे व नीरज मुनोत यांनी डॉक्टरांच्या कार्याबद्दल कौतुक  केले.  यावेळी  डॉ. भूषण मगर, डॉ. प्रीती मगर यांनीही सर्व डॉक्टरांच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!