चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील शिंदी येथील शेतकऱ्यांकडून एका व्यापाऱ्याने ३१ क्विंटल आद्रकाची खरेदी करून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात व्यापारीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील शिंदी येथील शेतकरी प्रदीप पांडुरंग अगोणे (वय-४३) हे वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्यास आहे. शेती व्यवसाय करून अगोणे आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवित असतो. दरम्यान अगोणे यांना गेल्या वर्षी शेतीतून ३१ क्विंटल आद्रक निघाली. त्यावर २० जूलै २०२० रोजी अरूण अशोक कुलकर्णी रा. गणेशपुर ता. चाळीसगाव नामक व्यापाऱ्यांनी अगोणेकडून ४ हजार रुपये प्रति क्विंटल दराने आद्रकाची खरेदी केली. एकूण १,२४,००० रूपयांपैकी कुलकर्णी यांनी संबंधित शेतकऱ्याला ३९ हजार रुपये रोकड देऊन उर्वरित ८५ हजार रुपये नंतर देण्यात येईल असे सांगितले. मात्र संबंधित शेतकऱ्यांनी वारंवार व्यापाऱ्यांकडे पैशाची मागणी केली. परंतु वर्ष उलटला तरीही पैसे देण्यास त्याच्याकडून टाळाटाळ होत आहे. त्यामुळे सदर व्यापारी नामे कुलकर्णी यांनी आपली फसवणूक केली. हे स्पष्ट झाल्यावर अगोणे यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानक गाठून भादवी कलम- ४०६, ४२०, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि धरमसिंग सुंदरडे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोहेकॉ ओंकार सुतार हे करीत आहे.