शिंदाड ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत सखुबाई धनगर बिनविरोध

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  तालुक्यातील शिंदाड ग्रामपंचायत मधील एका जागेच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या सखुबाई नाना धनगर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

 

शिंदाड च्या प्रभाग क्रं. ४ मधील ठगुबाई श्रीराम धनगर यांचे गेल्या वर्षी आकस्मिक निधन झाले. या रिक्त जागेवर पोटनिवडणुक घोषित झाली होती. मात्र येथील उपसरपंच भाजपचे नरेंद्र पाटील व संदीप सराफ यांच्या प्रयत्नाने या जागेसाठी प्रभागातून कुणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.

 

यामुळे धनगर समाजाला न्याय देण्यासाठी मयत ग्रा. पं. सदस्या ठगुबाई धनगर यांच्याच जाऊ सखुबाई नाना धनगर यांनाच भाजप तर्फे उमेदवारी देऊन त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. सखुबाई धनगर यांच्या बिनविरोध निवडीबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content