शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात २०० दिव्यांगांची तपासणी

जळगाव प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात  आज बुधवारी ८ सप्टेंबर रोजी दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याबाबतचे कामकाज झाले. २०० लाभार्थ्यांनी उपस्थिती देऊन प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यवाही पूर्ण केली.

ज्या  दिव्यांग बांधवानी ८ सप्टेंबरचे कुपन घेतले होते अशा २०० दिव्यांगांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी सकाळी ९ ते १ वाजेदरम्यान करण्यात आली. तपासणी मुख्य गेट नं. २  कडील  अधिष्ठाता कार्यालयासमोरील दिव्यांग मंडळाच्या कार्यालयात तसेच ओपीडी कक्षात झाली. नेहमी दिसणारी गर्दी हि मर्यादित झाली.  दर बुधवारी होणारी गर्दी आणि गैरसोय पाहता दिव्यांग मंडळाने सुरु केलेल्या आगाऊ बुकिंग कुपन प्रणालीला चांगला उदंड प्रतिसाद लाभला आहे. यामुळे कामकाजात सुटसुटीतपणा आला आहे.

उपअधिष्ठाता तथा दिव्यांग मंडळाचे अध्यक्ष डॉ. मारुती पोटे, मंडळाचे सचिव तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित यांच्यासह तज्ज्ञ  डॉ. राजेंद्र अग्रवाल, डॉ. पंकज घोगरे, डॉ. दिलीप महाजन, डॉ. हितेंद्र राऊत, डॉ.सुप्रिया पेंडके पाटील, डॉ. शिवहर जनकवाडे, डॉ. नेहा भंगाळे यांनी दिव्यांगांची तपासणी केली.  डॉ.वैष्णवी पाटील, कर्मचारी अनिल निकाळजे, विशाल दळवी, आरती दुसाने, भूषण निकम, वाल्मिक घुले, प्रकाश पाटील, अजय जाधव, विश्वजीत चौधरी यांनी सहकार्य केले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!