जळगाव, प्रतिनिधी । शासकीय औद्योगिक प्रशिक्षण महाविद्यालयाच्या परिसरातील सुकलेल्या गवताला आग लागली असता अग्निशमन दलाच्या जवानांनी ती आटोक्यात आणली. सुदैवाने यात कोणतीही जीवित व वित्त हानी झाली नाही.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण महाविद्यालयाच्या आवरा लगत एमएसइबीचे सब स्टेशन आहे. या सब स्टेशनच्या परिसरात ट्रान्सफार्मर जवळ प्रथम आग लागली. ही आग नंतर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण महाविद्यालयातील सुकलेल्या गवतास लागली. आग दिसताच येथील सुरक्षारक्षक यांनी महाविद्यालयाचे ओएस कुमावत यांना याबाबत सूचित केले. श्री. कुमावत यांनी लागलीच अग्निशमन दलास फोन केला असता अग्निशमन विभागाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झालेत. प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले की, एमएसइबी सब स्टेशनच्या आवारात आग लागली, अग्निशमन दलाची गाडी आली तरी एमएसइबीच्या एकही कर्मचारी घटनास्थळी आला नाही. ही आग अग्निशमन दलाचे संजय भोईटे व सरदार पाटील यांनी शर्थीचे प्रयत्न करून आटोक्यात आणली.
भाग १
https://www.facebook.com/508992935887325/videos/806384570003079
भाग २
https://www.facebook.com/508992935887325/videos/285075926506178