शारदा माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप 

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील कळमसरे येथील विकास सोसायटीचे संचालक रमेश चौधरी यांनी शारदा माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववीच्या वर्गात शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.

रमेश चौधरी यांचे चिरंजीव नितीन चौधरी याचे गेल्या पंचवीस वर्षांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले होते. तो नववीच्या वर्गात शिकत असताना त्याचे अचानक निधन झाल्याने रमेश चौधरी नितीनच्या आठवणीत गेल्या पंचवीस वर्षापासून दरवर्षी शाळेत शैक्षणिक साहीत्य वाटप करीत आहेत.

यावेळी शाळेतील मुख्याध्यापक श्रीमती कल्पना शिसोदिया, उपशिक्षक आर. डी.चौधरी, डी.डी.जाधव, व्ही. पी.महाजन, आर.सी. बडगुजर, सुनील गर्जे अधीक्षक अशोक चौधरी आदींची यावेळी उपस्थिती होती.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.