जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहीद दिनानिमित्ताने आज महापालिकेच्या १७ माजली सरदार वल्लभभाई पटेल प्रशासकीय इमारतीत महापौर जयश्री महाजन यांनी अभिवादन केले.
शहीद दिनानिमित्त शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमेस महापौर जयश्री महाजन यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी कार्यालय अधीक्षक चंद्रकांत वांद्रे, नितीन पटवे, राजू कोळी, सुरेश कोल्हे, प्रमोद निकम आदी उपस्थित होते.