शहीदांच्या स्मरणार्थ २६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

चाळीसगाव, प्रतिनिधी | २६/११ च्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या स्ममणार्थ चाळीसगावात २६ नोव्हेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन शहर पोलिस स्थानकात करण्यात आले आहे. शहर पोलिस व सत्यम रक्तदाता ग्रृप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, मुंबई येथे २६ नोव्हेंबर २००८ रोजी आतंकवादी यांनी भ्याड हल्ला केला. यात पोलिस अधिकारी व कर्मचा-यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले. परंतु यात अनेक निष्पाप जवानांना आपले जीव गमवावे लागले. यामुळे त्यादिवसाची आठवण राहावी यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांच्या संकल्पनेतून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात शहर पोलिस व सत्यम रक्तदाता ग्रृप यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच २६ नोव्हेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर उत्साहात पार पडणार आहे. यामुळे चाळीसगावातील जास्तीत जास्त तरूणांनी शिबिरात सहभागी नोंदवून रक्तदान करावे असे आवाहन शहर पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांनी केले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!