शहर पोलिसांत मोबाईल चोरट्या विरोधात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । शहरातील जिल्हा परिषदजवळ असलेला नवजीवन कलेक्शन समोरील मोकळ्या जागेतून एका तरुणाचा 15 हजार रुपये किमतीचे 2 मोबाईल एकाने चोरून नेल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राधेश्‍याम कैलास पांडे  (वय-22 रा. शनिपेठ)  हे 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद रोड वरील नवजीवन कलेक्शन समोरील असलेल्या मोकळ्या जागेवर उभे असताना त्यांचा 5 हजार रुपये किमतीचा मोबाइल आणि सोबत असलेल्या चंद्रकांत भीमराव पाटील यांचा 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल संशयित आरोपी विजय गुलाबराव पवार याने चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयित आरोपी विजय पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस नाईक किशोर निकम करीत आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!