शहरात सुरू असलेले निष्कृष्ट दर्जाचे काम थांबवा – हरिभाऊ पाटीलांची मागणी (व्हिडीओ)

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा शहरात सध्या सुरू असलेल्या भुयारी गटारीचे कामे बोगस व निकृष्ठ दर्जाचे काम तसेच इस्टीमेट नुसार व्यवस्थित अणुरेणू काम नसतांना पाचोरा नगर पालिकेचा बांधकाम विभाग झोपेचे सोंग घेवून बोगस व निकृष्ठ दर्जाच्या कामाचे बिले तात्काळ मंजुर करण्यासाठी कोणत्याही कामाची खातरजमा न करता मंजूर करून देण्यात येत आहे. 

भुयारी गटारी च्या कामामुळे शहरातील रस्त्यांची होत असलेली तोडफोड त्या भागातील गटारी चे काम संपल्यानंतर दुरूस्ती करण्याचे काम भुयारी गटारी च्या मक्तेदाराची जबाबदारी असुन पण ते तसे न करता त्या रस्त्यांच्या दुरूस्ती साठी नगर पालिका वेगळ्या निधीतून स्व खर्च करतेय हे मुळातच नगर पालिकेच्या अधिकारी यांचे चुकीचे असुन मनमानी सुरू आहे. नको त्या ठिकाणी आपला जनतेचा पैसा विनाकारण खर्च करण्याचा धुमधडाका जोमाने सुरू केलेला आहे. तोडफोड झालेल्या रस्त्याची दुरूस्ती करणे हे भुयारी गटारीच्या मक्तेदाराचे कर्तव्यच आहे. परंतु हे अधिकारी ते रस्ता दुरूस्तीचे काम मक्तेदाराकडून करून न घेता स्व:ता नगर पालिकेच्या खर्चातुन करताना दिसून येत आहे. तरी असे भोंगळ कामे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ थांबवून खराब झालेल्या रस्त्याची कामे मक्तेदाराकडून करून घेण्यात यावे आणि भुयारी गटारीचे काम इस्टीमेट नुसार केल्यावरच त्या मक्तेदाराचे बिले पास करण्यात यावे, अशी मागणी बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशन, पाचोरा यांचे तर्फे करण्यात येत आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1572971933092189

 

Protected Content