शरद पवार यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीचा अपघात; सुदैवाने पोलीस बचावले

पुणे वृत्तसंस्था । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या एका गाडीला अपघात झाला. शरद पवार हे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे अर्थात द्रुतगती मार्गावरुन पुण्याहून मुंबईला जात होते. पोलिसांची गाडी स्लिप होऊन उलटली. सुदैवाने पोलिसांना मोठी दुखापत झालेली नाही. तर शरद पवारांची गाडी सुखरुप मुंबईकडे रवाना झाली.

store advt

शरद पवार हे पुण्यावरुन मुंबईकडे निघाले होते. अमृतांजन पुलाजवळ हा अपघात झाला. शरद पवारांची गाडी पुढे होती. त्यामुळे त्या गाडीला काहीही झालं नाही. दरम्यान, महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन, अपघातग्रस्त वाहन हटवले याबाबत प्रवक्ते अंकुश काकडे म्हणाले, “आज सकाळी पवारसाहेब पुण्याहून मुंबईला निघाले. मुंबईला जात असताना खंडाळा घाटात अमृतांजन पुलाजवळ हा अपघात झाला. पण किरकोळ अपघात होता. सुदैवाने मोठी दुर्घटना नाही.

error: Content is protected !!