जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हा बँकेवर केलेले भाष्य चर्चेचा विषय बनले आहे.
अलिकडेच झालेल्या जळगाव जिल्हा बॅकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बंडखोर नेते संजय पवार विजयी झाले. या सत्तांतरामध्ये पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी महत्वाची भूमिका होती. याबाबत ना. गुलाबराव पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलतांना खास आपल्या शैलीत भाष्य केले आहे.
या संदर्भात ना. गुलबराव पाटील म्हणाले की, कोणत्याही परिस्थिती आम्ही त्यांना साथ दिली, त्यांना १०० टक्के साथ दिली आहे. त्यावेळी आमचे सहा सदस्य आहेत, तुमचे सात आहेत हे त्यांना सांगितलं होतं. पण यांनी बरोबर सगळं जुळवून आणलं. माझा सांगायचा अर्थ असा आहे की, पवार हे कलाकार आहेत. शेवटी ते पवार आहेत. शरद पवार कसे चावी देतात. कधी ही चावी दे, तर कधी ती चावी दे. शरद पवारांची चावी कुठेही चालते. त्यांनी बरोबर कॉंग्रेसवाले पटवले. उठोबा-बठोबाचा एक माणूस पटवला आणि अशी मिसळ तयार झाली असल्याचे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी केले.