शनिवारी आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी निवड चाचणी

जळगाव प्रतिनिधी । आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्ह्यातील सर्व १६ वर्षांखालील क्रिकेट खेळाडूंची  निवड चाचणीचे शनिवार २४ जुलै रोजी आयोजन करण्यात आले आहे.  जिल्हातील जास्तीतजास्त क्रिकेट खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन  जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी केले आहे. 

 

शनिवार २४ जुलै २०२१ रोजी निवड चाचणी जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या ( विद्या इंग्लिश स्कूल मागील ) मैदानावर घेण्यात येणार आहे. या चाचणीत  जे खेळाडूं ०१ सष्टेंबर २००५ रोजी किंवा  त्यानंतर जन्मलेले असेल त्यांनी सकाळी ८ वाजता उपास्थित राहावे.  जळगाव  जिल्हातील जास्तीतजास्त क्रिकेट खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवावा.  निवड चाचणी जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या ( विद्या इंग्लिश स्कूल मागील ) मैदानावर घेण्यात येईल. सर्व खेळाडूंनी क्रिकेटच्या पांढऱ्या गणवेशात  उपस्थित राहावे.  या निवड चाचणीसाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे, त्याची लिंक https://forms.gle/u1SKzBHoxaBxaedMA असून अधिक माहितीसाठी अरविंद देशपांडे (९४२२२७८९३६) व मोहम्मद फजल (९८३४१९७०७०) यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी केले आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!