व्यापाऱ्याचे दुकान फोडून मुद्देमाल लांबविला

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील कृषि उत्पन्न बाजार समितीजवळ असलेल्या एक दुकानातून व्यापाऱ्याचे लोखंड कापण्याचे मशिन आणि रोख रक्कम असा एकुण २६ हजार ७८८ रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे समोर आले आहे. याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा शहरातील उंदिरखेडा रोडवर असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ असलेले श्रीपाद पॉवर टुल्स नावाचे दुकान हे निखिल राजेंद्र सोनवणे (वय-२५) रा. रथ गल्ली पारोळा यांचे आहे. ३ जून रोजी रात्री ९ ते ४ जून रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडून दुकानातील लोखंड कापण्याचे मशिन आणि रोकड असा एकुण २६ हजार ७८८ रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी निखील सोनवणे यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रविण पारधी करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!