वेळ येऊ देणार नाहीत म्हणत अजित पवारांचा राज्यपालांविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा

 

मुंबई वृत्तसंस्था । . राज्यपाल भगत सिंह कोश्यारी विधान परिषेदच्या १२ जागांसाठी न्यायालयात जाऊ देण्याची वेळ येऊ देणार नाहीत, असं म्हणत अजित पवार यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अजित पवारांनी शेतकरी आंदोलन आणि १२ आमदारांच्या नियुक्तबद्दल भाष्य केलं. “बहुमत असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी सर्व निकष पाळत योग्य त्या नावांची शिफारस केली आहे. सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन नियमात बसणारे १२ जणांची नावं निश्चित केली आहेत. राज्यपालांना रीतसर सगळं कळवलेलं आहे. राज्यपाल त्यांची भूमिका जाहीर करतील. न्यायालयात जाऊ देण्याची वेळ येऊ देणार नाहीत,” असं म्हणत अजित पवारांनी सूचक इशारा दिला आहे.

 

यावेळी अजित पवार यांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून पंतप्रधान मोदींना टोला लगावला. “केंद्र सरकारनं दोन पावलं मागं यावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्वीच्या आठवणींना उजाळा देताना भावूक झाले. तोच भावूकपणा शेतकऱ्यांच्या बाबतीत दाखवला तर बरं होईल, असं म्हणत अजित पवारांनी मोदींना टोला लगावला आहे. “महाविकास आघाडीत कोणतेही वाद नाहीत. कोणताही निर्णय घेताना उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी एकत्र बसून घेतील’, असं सांगत अजित पवारांनी यांनी विधानसभा अध्यक्षपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला.

 

“पुढच्या वर्षी जिल्हा अंतर्गत चॅलेंज फंड अंतर्गत ५० कोटी फंड देणार आहे. यावेळी आर्थिक ओढाताण असली, तरी कोणत्याही वार्षिक योजनेला कट लावलेला नाही. कोविड उपाययोजने करता नाशिकला ७० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्याचा निधी नियोजन समितीच्या माध्यमातून दिला जातो. शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात येईल,” अशी माहितीही पवार यांनी दिली.

Protected Content