जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प हा गुजरात राज्यात वळविण्यात आला आहे. हा महाराष्ट्रासाठी अन्याय असल्याने याच्या निषेधार्थ महापालिकेच्यासमोर युवासेनेच्या वतीने शिंदे-फडणवीस सरकारच्या निषेधार्थ महापालिकेसमोर गुरूवार १५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आले. यावेळी युवासेनेच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला पळवल्याचा विरोधात युवासेना रस्त्यावर उतरली आहे. राज्यातील १ लाख ५८ हजार कोटींचा प्रकल्प शिंदे-फडणवीस सरकारच्या चुकीमुळे महाराष्ट्रातून गुजरातला गेला आहे. यावेळी महापौर जयश्री महाजन म्हणाल्या की, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? प्रकल्प गेल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी गंभीर होण्याची गरज आहे. राज्य आणि देशासमोर बेरोजगारीचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे हलगर्जीपणा करून चालणार नाही. महाराष्ट्राला विकसीत होण्यापासून पुढे जाण्यापासून थांबविला जात आहे. राज्याच्या हितासाठी एकत्र येणाची गरज आहे. अंतीम टप्प्यावर असतांना हा प्रकल्प गेल्याने राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. असे बोलतांना सांगितले.
याच्या निषेधार्थ जळगाव महापालिकेसमोर युवासेनेच्या वतीने गुरूवारी १५ सप्टेंबर रेाजी दुपारी १२ वाजता निषेध स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली. यावेळी युवासेनेचे प्रमुख पदाधिकारी व किशोर भाऊँ भोंसले (युवासेना विस्तारक), प्रशांत सुरलकर(शिवसेना उपमहानगर), पियुष गांधी(उपजिल्हा युवा अधिकारी), विशाल वाणी(महानगर युवा अधिकारी), यश सपकाळे (ऊपमहानगर युवा अधिकारी), जय मेहता(उपमहानगर युवा अधिकारी), अंकित कासार (विद्यापीठ युवा अधिकारी), अमोल मोरे(विभाग युवा अधिकारी), जया थोरात(युवती अधिकारी), महेश ठाकुर, अमित जगताप, प्रीतम शिंदे, आबिद खान, विनोद गायकवाड़, अक्षय पाटील, गजेंद्र कोळी व सिद्देश कोळी यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/372158295126888