वृषाली जोशी यांची बालकल्याण समिती सदस्यपदी निवड

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राज्य शासनाच्या बाल कल्याण समितीवर (सीडब्ल्यूसी) केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित चाईल्ड लाईन १०९८ च्या समुपदेशिका वृषाली जोशी यांची तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

बाल कल्याण समितीवर एक अध्यक्ष आणि चार सदस्यांची नियुक्ती सरकारकडून केली जाते. बालकामगार तसेच अनाथ किंवा वाट चुकलेली मुले किंवा आई-वडील मारहाण करत असल्यास मुलांना पालकांसोबत राहायचे नसते किंवा जन्मत:च मुलांना बेवारस स्थितीत सोडून दिले जाते. अशा शून्य ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना बालकल्याण समितीपुढे हजर केले जाते. समितीने दिलेल्या आदेशानंतर मुलांची रवानगी शिशूगृह किंवा बालगृहात केली जाते. तसेच, या अल्पवयीन मुला-मुलींच्या पालकांचा शोध घेण्याबाबतही ही समिती संबंधित यंत्रणांना आदेश देते. मुलांच्या दत्तक प्रक्रियेच्या कामातही ही समिती महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. विशेष म्हणजे मुलांना या समितीपुढे २४ तासांच्या आत हजर करणे गरजेचे आहे. पोलिसही मुलांना समितीपुढे घेऊन येतात. बाल कल्याण समितीसह जिल्ह्यात बाल न्याय मंडळही असते. वृषाली जोशी यांनी चाईल्ड लाईनच्या माध्यामतून अनेक बालकांना मदत मिळवून देणे, बालविवाह थांबविणे यात सक्रिय योगदान दिलेले आहे. ओपन हाउस सारख्या उपक्रमातून बालकांचे समुपदेशनाचे कार्य करत आहेत. त्यांच्या नियुक्तीबद्दल केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, उपाध्यक्ष निळकंठ गायकवाड, सचिव रत्नाकर पाटील, चाईल्ड लाईन समन्वयक भानुदास येवलेकर यांचेसह केशवस्मृती परिवारातील सर्व सदस्यांनी अभिनंदन केले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!