वृध्द महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविली

रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मोहननगर येथून साफसफाईचे काम आटोपून घरी जात असताना वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगलपोत अज्ञात चोरट्याने हिसकावून लांबविण्याची घटना सोमवारी १५ मे रोजी दुपारी १ वाजता घडली आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कमलाबाई रघुनाथ भालेराव (वय-६५) रा. समता नगर, मरीमाता मंदिराजवळ जळगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी १५ मे रोजी दुपारी १ वाजता त्या साफसफाईचे काम आटोपून घरी पायी जात असताना शहरातील मोहन नगर येथे एक अनोळखी तरुण त्यांच्याजवळ येऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याचे पथक असलेली मंगलपोत जबरी हिसकावून चोरून नेली. झालेल्या झटापटीत वृद्ध महिलेच्या मानेला जखम झाली आहे. ही घटना घडल्यानंतर वृद्ध महिलेने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. वृद्ध महिलेच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात दुपारी ४ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गबाले करीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content