जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील जगवानी नगरात राहणाऱ्या वृद्धाच्या उघड्या घरातून मध्यरात्री ८० हजार रुपयांची रोकड लांबवल्याची घटना समोर आले आहे. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, निवृत्ती नथू पाटील (वय-८०, रा. जगवानीनगर, एमआयडीसी, जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ४ एप्रिल सायंकाळी ५ वाजता ते ८ एप्रिल दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरातील लाकडी कपाटातून ८० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. हे रोकड पल्लवी उर्फ सोनी प्रवीण हिवाळे रा. हिवरा ता. मलकापूर जि. बुलढाणा हिने चोरून नेल्याच्या संशय निवृत्ती पाटील यांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरुवार २० एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता निवृत्ती पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत करीत आहे.